Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : लस घेतली नाही अन् घेणारही नाही; इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची...

Video : लस घेतली नाही अन् घेणारही नाही; इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील घोटी (Ghoti) येथे कृपी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते….

- Advertisement -

या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी करोना परिस्थिती व लसीबाबत खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगवेगळी आहे हे कळायला नको का?

प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा असे ते म्हणाले.

१४ वर्ष राम वनवासात गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावूनदेखील पाहिले नाही अशी परिस्थिती करोनाकाळात झाली. या वादग्रस्त दाव्यामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एकीकडे आदिवासी तालुक्यात (Tribal Taluka) सुरुवातीपासून लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी (Vaccination Drive) सर्वात अधिक अडचणी येत आहेत. एका बाजूला शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना अशी वक्तव्य नागरिकांचा संभ्रम निर्माण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या