Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशइंडिगोच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये एमर्जन्सी लँडिंग

इंडिगोच्या विमानाचे पाकिस्तानमध्ये एमर्जन्सी लँडिंग

दिल्ली Delhi

इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानाचे मंगळवारी पाकिस्तानच्या कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. शारजाहहून लखनौत येणाऱ्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पायलटला इमरजेंसी लँडिंग करावी लागली. वैमानिकाने परिस्थितीची माहिती पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला देऊन विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता एटीसीने वैमानिकाला खाली उतरण्यास परवानगी दिली. पण दुर्दैवाने तरीही प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.

इंडिगो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शारजावरुन लखनौला जाणाऱ्या विमान क्रमांक 6E 1412 ला मेडिकल इमर्जन्सीमुळे पाकिस्तानच्या कराचीकडे वळवण्यात आले. प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने इंडिगोच्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी कराची विमानतळाकडे परवानगी मागितली होती. पण दुर्दैवाने प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. विमानतळावर लँडिंगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाला मृत घोषीत केलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे.

दरम्यान याआधी देखील, मागील वर्षी रियाधहून दिल्लीला जाणाऱ्या गो-एअर विमानाला वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीमुळे कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले होते. त्यावेळीही विमानातील प्रवाशाला कार्डिक अरेस्ट आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या