Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऐन दिवाळीत करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव; तज्ज्ञांकडून सतर्केचा इशारा

ऐन दिवाळीत करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव; तज्ज्ञांकडून सतर्केचा इशारा

पुणे | Pune

महाराष्ट्रामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ १७.७% आहे. यामध्ये आता पुण्यात ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BQ.1, BA.2.3.20 देखील आढळला आहे. हा BA.2.75 आणि BJ.1 यांचे रिकॉम्बिनंट आहे.

- Advertisement -

नव्या व्हेरिएंटचा देशातील पहिला रूग्ण पुणे शहरात आढळला असल्याने आता प्रशसन देखील अलर्ट मोड वर आलं आहे. या कारणास्तव, तज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. दिवाळीच्या आधी आणि नंतर सण साजरे करताना, बाजारपेठेत गर्दी वाढल्याने कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात, असे त्यांचे मत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या