Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभारतीय नौदल आणि एनसीबीची मोठी कारवाई; 'इतक्या' कोटींचे ड्रग्ज जप्त

भारतीय नौदल आणि एनसीबीची मोठी कारवाई; ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई | Mumbai

भारतीय नौदलाने (Indian Navy) अरबी समुद्रात मोठी कारवाई केली असून इराणहून गुजरातला आणला जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने (Narcotics Control Bureau) मिळून ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

या छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन (methamphetamine) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथॅम्फेटामाइन औषधांची खेप सापडली आहे. नौदलाने या मालासह एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले आहे. देशातील ही सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा आल्याने एकच खळबळ उडाली असून या दोन्ही तपास पथकाची झोप उडाली आहे.

याप्रकरणी आता कसून तपास केला जात आहे. हे ड्रग्ज इराणहून गुजरातच्या बंदरावर आणले जात होते. तिथे पोहोचण्यापूर्वीच हे ड्रग ताब्यात घेण्यात आली आहे. या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेण्यात आले असून त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, ते कोणाला डिलिव्हर केले जाणार होते, आदींची चौकशी केली जाणार आहे.

The Kerala Story ची एक्सप्रेस सुसाट, अवघ्या नऊ दिवसांत कमावले १०० कोटी

हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून केरळमध्ये समुद्रमार्गे आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही ड्रग्स माफिया भारतात ड्रग्स आणणार असून अरबी समुद्रातून ही तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. कुठल्या तरी बंदरावर हे ड्रग्स उतरवले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करत हा साठा पकडला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत सुमारे ३२०० किलो मेथॅम्फेटामाइन, ५०० किलो हेरॉईन आणि ५२९ किलो चरस जप्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटक निकालावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, “आपलं कोणीही वाकडं…”

- Advertisment -

ताज्या बातम्या