Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभारतीय वायुसेनेचं विमान कोसळले, अपघाताचा VIDEO व्हायरल

भारतीय वायुसेनेचं विमान कोसळले, अपघाताचा VIDEO व्हायरल

दिल्ली | Delhi

भारतीय वायुसेनेच्या(IAF) विमानाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे मिराज विमान गुरुवारी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बाबडी गावात कोसळले.

- Advertisement -

ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारतीय हवाई दलाने अधिकृत ट्विटर हँडल वरून याची माहिती दिली. या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी बाडमेरमध्ये भारतीय वायुसेनेचे एक मिग विमान राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील भूटारिया गावाजवळ कोसळलं होतं. अपघातानंतर वैमानिक सुखरूप होते, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या