Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशअफगाणिस्तानातून 130 भारतीयांना घेऊन विमान दाखल

अफगाणिस्तानातून 130 भारतीयांना घेऊन विमान दाखल

नवी दिल्ली

तालिबानने अफगाणिस्तानचा(Afghanistan) पाडाव केल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. तालिबानचा (taliban)वाढता धोका लक्षात अफगाणिस्तानमधील भारतीय (Indian) दूतावास कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे. काबूलहून 130 भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. गुजरातच्या जामनगरच्या विमानतळावर वायुसेनेचे (air-force) C-17विमान दाखल झाले आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 130 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

अफगाणिस्तानात (Afghanistan)काही वाहिन्यांनी दैनंदिन कार्यक्रमांवजी इस्लाम (islam)धर्माशी संबंधीत कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी महिला सूत्रसंचालकांना दाखवण्यास बंदी केली आहे. माध्यमानचं स्वातंत्र्यही धोक्यात आलं असून, त्यांचंही तालिबानीकरण झाल्याची चिंताग्रस्त बाब अफगाणिस्तानातील दृश्य पाहतानात दिसत आहे.

भारतावर काय परिणाम?

भारताने अफगाणिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलर खर्च केले. ती गुंतवणूक नव्हती. ती मदत होती. त्यात गेल्या 20 वर्षांत भारताने अफगाणिस्तानमध्ये सुमारे 500 लहान-मोठे प्रकल्पांमध्ये पैसे खर्च केले आहेत. यामध्ये शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रे, मुलांची वसतिगृहे आणि पूल यांचा समावेश आहे. भारताने अफगाणिस्तानचे संसद भवन, सलमा धरण आणि झरंज-देलाराम महामार्ग यासारख्या प्रकल्पांवर बराच खर्च केला आहे. तालिबान यासंदर्भात आता काय करेल? याकडे लक्ष लागले आहे.

चाबहारचे काय होणार

इराणचे चाबहार बंदर भारताला अफगाणिस्तान आणि इराणला मध्य आशियाई देशांशी जोडते. या प्रकल्पाद्वारे भारताला अफगाणिस्तानशी थेट व्यापाराचा मार्ग बनवायचा होता. आता या प्रकल्पांचे भविष्य काय असेल हे सांगणे खूप कठीण आहे. येत्या काळात अफगाणिस्तानसोबत कराची आणि ग्वादर बंदरांद्वारे व्यापार होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत चाबहार बंदरात भारताची गुंतवणूक अव्यवहारिक असू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या