Friday, April 26, 2024
Homeक्रीडाइंडो-नेपाळ कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

इंडो-नेपाळ कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नेपाळ येथे झालेल्या दुसर्‍या इंडो-नेपाळ कबड्डी स्पर्धेत ( Indo-Nepal Kabaddi Championship )भारताला सुवर्णपदक मिळाले असून या संघात देवळालीच्या केंद्रीय विद्यालयाच्या शारदा प्रसाद तिवारी याचा समावेश होता.

- Advertisement -

17 वर्षाखालील स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट कमिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित नेपाळच्या पोखारा येथे नेपाळ युथ स्पोर्ट्स डेव्हलोपमेंट फोरमच्या (Nepal Youth Sports Development Fourm ) वतीने दुसरी आंतरराष्ट्रीय खेळ-2022 चे आयोजन करण्यात आले होते.

त्यात भारताचा संघ शारदाप्रसाद तिवारीच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता, या संघाने अंतिम सामन्यात नेपाळला 51- 49 अशा गुणांनी पराभूत करत ही स्पर्धा जिंकली. त्याला प्रशिक्षक जी.क्यू.उस्मानी यांचे मार्गदर्शन मिळाले, तर प्राचार्य राजेश कुमार, उपप्राचार्य परमदेव यादव आदींसह सर्व शिक्षकांनी तिवारी याचा शाळेत सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या