Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाIND vs NZ : आज ‘पिंक सिटी’मध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने, अशी असू शकते...

IND vs NZ : आज ‘पिंक सिटी’मध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

जयपूर | Jaipur

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) अपयशी ठरलेला भारतीय संघ (Team India) आता न्यूझीलंविरुद्धची टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका भारतात खेळवली जाणार आहे.

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. जयपूरमध्ये होणारा हा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल.

पुढचा विश्वकरंडक नऊ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात होत आहे आणि त्यादृष्टीने संघ बांधणीबरोबर विचारसरणीचीही बदलाची प्रक्रिया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुरू होणार आहे. आखातातील विश्वकरंडक स्पर्धेत साखळीतच पराभूत होण्याची नामुष्की आल्यानंतर भारतीय संघ नव्या वळणावर आला आहे. रवी शास्त्री यांचे पर्व संपत असताना विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडले आहे.

दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध आयपीएल गाजविलेल्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल आणि आवेश खान या खेळाडूंनी आयपीएल गाजवली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत या खेळाडूंवर लक्ष असेल. पुढच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची तयारी या ताज्या दमाच्या खेळाडूंपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद सिराज, दीपक चहर, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

डॅरेल मिशेल, मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, जिमी नीशम, मिचेल सँटनर, काइल जेमिसन, टिम साउथी (सी), ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.

- Advertisment -

ताज्या बातम्या