Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठया प्रमाणात आवक

बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठया प्रमाणात आवक

लासलगांव । हारून शेख Lasalgaon

लासलगांव( Lasalgon ), निफाड( Niphad ), विंचूर( Vinchur ) बाजार आवार( A{MC ) समितीत सोमवार ते शनिवार सहा दिवसात तब्बल १९१६५१ क्विंटल कांद्याची ( onion)आवक झाली.

- Advertisement -

या मध्ये लासलगाव मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याची 1,03,742 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 600 कमाल रुपये 2,099 तर सर्वसाधारण रुपये 1,700 प्रती क्विंटल होते. निफाड उपबाजार आवारावर उन्हाळ कांदा आवक 17,800 क्विंटल होऊन बाजार भाव रुपये किमान 651 कमल 1,816 सरासरी रुपये 1,675, होते तर विंचूर उपबाजार आवारात उन्हाळ कांदा आवक 70,109 क्विंटल होऊन भाव रुपये किमान 500 कमाल 2,100 सरासरी रुपये 1,750,होते

पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजमुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंदी असते.कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा,धान्य,भाजीपाला, टोमॅटो, डाळींब सह आदी शेतमालाची उलाढाल वाढली आहे.सभापती सुवर्णा जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहे यंदा बाजार समितीत उलाढाल वाढली आहे.

आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कडे पाहिले जाते. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी भावना शेतकर्यांमध्ये आहे. कांद्याबरोबर धान्य,भाजीपाला, टोमॅटो, डाळींब मका व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीत आवार देखील कमी पडू लागले आहे. .

चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगाव चा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो.देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे.

कांदा खरेदीदारांनी कंटेनर द्वारे निर्यातीसाठी माल पाठविणे सुरु केल्याने ट्रक वाहक-मालक संघटनेने याला विरोध दर्शवत कंटेनर चालक आणि मालकांना नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा पडून असून निर्यातीवर परिणाम होत आहे असे व्यपारी असोसिएशन कडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या