Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशऑक्सफेम अहवाल : देशात अब्जाधीश वाढले, सामान्यांचे उत्पन्न घटले

ऑक्सफेम अहवाल : देशात अब्जाधीश वाढले, सामान्यांचे उत्पन्न घटले

देशातील विषमतेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ताज्या अहवालानुसार, देशातील अब्जाधीशांची (billionaires)संख्या 102 वरुन 142 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 84 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. ही आकडेवारी 2021 मधील आहे. (Wealth double in covid-19)

Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले…कोणी राजे आलेत का?

- Advertisement -

कोरोनाचा काळ हा अर्थव्यवस्थेला धक्का देणारा किंवा लोकांची आर्थिक स्थिती बिघडवणारा असला तरी, कोट्यधीशांसाठी कोरोना संकट चांगलेच राहिले. ऑक्सफेमच्या (Oxfam)रिपोर्टनुसार, कोरोना संकट काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत जवळपास 5000 अब्ज डॉसर म्हणजेच सुमारे 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. जगातील टॉप-10 अब्जाधीशांची संपत्ती कोरोनाच्या काळात जवळपास दुप्पट (Billionaires) झाली आहे.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेपूर्वी जाहीर झालेल्या ऑक्सफेमच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या एक वर्षापूर्वी 102 वरून 142 वर पोहोचली आहे. या 142 अब्जाधीशांची एकूण संपत्ती या काळात सुमारे $720 अब्ज इतकी वाढली आहे. देशातील 40 टक्के गरीब लोकसंख्येच्या एकूण संपत्तीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. जगातील 10 सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत दिवसाला 1.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि या काळात त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.

लसीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

अब्जाधीशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर

ऑक्सफेमच्या अहवालानुसार अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता पहिल्या तीन देशांपैकी एक बनला आहे. आता भारतापेक्षा अमेरिका आणि चीनमध्ये अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंडच्या मिळून एकट्या भारतात अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे, देशातील ५० टक्के गरीब लोकांचा राष्ट्रीय संपत्तीत केवळ ६ टक्के वाटा आहे. यावरून भारतात विषमता किती चिंताजनक दराने वाढत आहे हे दिसून येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या