Thursday, April 25, 2024
Homeजळगावचिमुरडी पप्पा पप्पा ओरडत गेली अन्....खोलीत पप्पाने घेतला होता गळफास

चिमुरडी पप्पा पप्पा ओरडत गेली अन्….खोलीत पप्पाने घेतला होता गळफास

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील चिंचोली (Chincholi) येथील गणेश शिवाजी गोसावी (वय-३५) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान गोसावी यांची पाच वर्षांची चिमुरडी रात्री जेवणानंतर पप्पा वरच्या खोलीत गेल्याने त्याच्या मागे पप्पा करत करत गेली. खोलीत पोहचल्यावर पप्पाने गळफास घेतल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील शिवाजी प्रल्हाद गोसावी, पिंटू व सोनू हे दोन भाऊ, पत्नी गुड्डी, मुलगी परी आणि ४ वर्षाचा मुलगा सोम असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या