Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयशरद पवारांवर पडळकरांची बोचरी टीका, म्हणाले...

शरद पवारांवर पडळकरांची बोचरी टीका, म्हणाले…

जेजुरी l Jejuri

जेजुरी संस्थानाच्या वतीने जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच १३ फेब्रुवारीला होणार होते. परंतु…

- Advertisement -

त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. दरम्यान यावेळी पडळकरांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

पडळकर बोलतांना म्हणाले, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं. आहिल्याबाईंचं काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होतं. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही गनिमी काव्यानं जाऊन पुतळ्याचं अनावरण केल्याचंही पडळकर म्हणाले.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

याआधीही पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांची तुलना करोनाशी केली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे,” असं पडळकर यांनी म्हंटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या