Thursday, April 25, 2024
Homeजळगावभुसावळ शहरात भल्या पहाटेचा थरार...नगरसेवकाचे 60 हजार रूपये लुटले

भुसावळ शहरात भल्या पहाटेचा थरार…नगरसेवकाचे 60 हजार रूपये लुटले

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

मोटारसायकलने नेहमीप्रमाणे बाजाराच्या दिशेने जात असलेले माजी नगरसेवक (Ex-Corporator) प्रकाश (आबा शेठ) नामदेव चौधरी यांना चाकुचा धाक (Fear of the knife) दाखवून त्यांच्या जवळील रोख 60 हजार रूपये (Cash) व हिशोबाच्या डायर्‍या लुटून पोबारा केल्याची घटना आज (दि.19च्या) पहाटे 4.25च्या सुमारास टिंबर मार्केट ते अराधना कॉलनीला जोडणार्‍या पुलाखाली घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

- Advertisement -

मामाजी टॉकीज मागील विद्यानगर भागातील रहिवाशी व माजी नगरसेवक प्रकाश (आबाशेठ) नामदेव चौधरी हे भाजी मंडईमध्ये भाजीपाला अडतचे काम करतात. दि.19 च्या पहाटे ते नेहमीप्रमाणे त्यांच्या मोटारसायकलने टिंबर मार्केट स्थित भाजी मंडईत निघाले असता 4496 क्रमांकाच्या दुसर्‍या मोटरसायकलने दोन इसम पुलात शिरण्या आधी त्यांना म्हणाले ‘जाम मोहल्ला किधर है’ श्री.चौधरी यांनी ‘आगे है’ असे सांगितले असता या दोघांनी त्यांची गाडी दामटून पुलाजवळ पाटील यांच्यागाडी समोर आडवी लावली. मागे बसलेल्या एकाने चाकुचा धाक दाखविला तर दुसर्‍याने गाडीच्या हॅण्डलला लावलेली कापडी पिशवी हिसकावून पोबारा केला. या पिशवीमध्ये 60 हजाराच्या वर रोकड होती. श्री.चौधरी यांनी चोरट्यांचा पिछा केला.

मात्र ते अंधाराचा फायदा घेवून शिवाजी महाराजांचा पुतळा, तेथून जामनेर रोड व नाहाटा महाविद्यालयाकडे पसार झाले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. प्रकाश चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली. शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरिक्षक गजानन पडघन यांनी प्रकाश चौधरीसह घटनास्थळी जावून घटनाक्रम जाणून घेतला.

आरोपी हे हिंदी भाषिक होते व त्यांनी रेकी करून, दबा धरून घटनेला अंजाम दिला व हे आरोपी याच परिसरातील व प्रकाश चौधरी यांना ओळखत असावे असा अंदाज आहे. पोलिस या भागातील सर्व सीसी टिव्ही फुटेज खंगाळत आहेत. या पुलामध्ये दिवस रात्र अंधार असतो. लुटमारीच्या या घटनेने या भागातील नागरिक भयभीत झाले असून त्यांना रात्री अपरात्री यावे जावे लागते यासाठी या भागात उच्च दर्जाचे सीसी टिव्ही कॅमेरे स्व खर्चाने लावून देतो असे या भागाचे नगरसेवक युवराज लोणारी यांनी ‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या