Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळा तालुक्यात पुन्हा १९ अहवाल पॉझिटिव्ह

देवळा तालुक्यात पुन्हा १९ अहवाल पॉझिटिव्ह

भऊर | Bhaur

देवळा तालुक्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून २५ सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात…

- Advertisement -

देवळा तालुक्यात आणखी १९ करोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

२५ सप्टेंबर रोजी एकूण ६७ अहवाल प्राप्त झाले. यात १९ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ४८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालात देवळा शहर १२ (६ पुरुष, ६ महिला), लोहणेर २ (२ पुरुष), गुंजाळवाडी ३ (१ महिला, २ पुरुष), मकरंदवाडी १ (१ पुरुष) उमराणे १ (१महिला ) अशा ५ गावातील १९ रुग्णांचा समावेश आहे.

देवळा तालुक्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतः हुन आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या