Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऑगस्टमध्ये 'हर घर तिरंगा फडकणार

ऑगस्टमध्ये ‘हर घर तिरंगा फडकणार

औरंगाबाद-Aurangabad

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात ११ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) हे अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येक घर व शासकीय कार्यालयावर तिरंगा झेंडा (Tiranga Zenda) फडकाविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे यांनी दिली.

- Advertisement -

गटणे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येकांच्या मनात देशभावना जागृत व्हावी, या उद्देशाने पर्यटन व ग्रामविकास विभागाने ‘घर घर तिरंगा’ ((Har Ghar Tiranga)) हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरांवर 3 बाय २ तर कार्यालयांवर साडेचार बाय तीन फुटाचा ध्वज लावण्याचे ठरविले आहे. हा ध्वज लोकांनी स्वखर्चाने लावणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात ४ लाख ६६ हजार घरे व ३४ हजार आस्थापना आहेत. त्यामुळे आपल्याला किमान ५ लाख तिरंगा ध्वज लागतील. जिल्हा परिषद (Zilla Parishad) कमी दरात तिरंगा ग्रामपंचायती (Gram Panchayat), स्वस्त धान्य दुकानात, उपलब्ध करून देणार आहे. खादीच्या ध्वजाबरोबरच मशीनद्वारे तयार केलेले पॉलिस्टरचेही तिरंगा ध्वज लावण्यास मंजुरी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या