Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशडॉ. प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

डॉ. प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

मुंबई | Mumbai

पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (Defence Research and Development Organisation) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) सध्या येरवडा कारागृहात असून त्यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हनी ट्रॅप प्रकरणात डॉ. प्रदिप कुरुलकर यांची चौकशी सुरु असतानाच आता कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला भारतासंबंधी अत्यंत गोपनीय माहिती पुरवली असल्याचा धक्कादायक खुलासा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी ब्रह्मोस-अग्नी आणि युसीव्ही सारख्या क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचे समोर आले आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या शास्त्रज्ञाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) फसवून त्यांच्याकडून भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होता.

अंजनेरी-ब्रम्हगिरी रोपवे विरोधाला धार

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विशेष न्यायालयात कुरुलकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये सांगितल्याप्रमाणे, डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेर असलेल्या झारा दासगुप्ताला मिसाईल लाँचर, इमेटॉर रफेल, डीआरडीओचा ड्यूटी चँट संदर्भातील माहिती पुरवल्याे समोर आले आहे.

दहिवडला रानडुकरांचा उपद्रव; शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान

तसेच, एटीएसने ३० जून रोजी डॉ. कुरुलकर यांच्या विरोधात एटीएसने दाखल केलेल्या १८३७ पानांच्या आरोपपत्रात मोठ्या बाबी उघड झाल्या आहेत. यातील एका चॅटमध्ये, पाकिस्तानी एजंटांनी अग्नी-६ लाँचर चाचणी यशस्वी झाली का, असे विचारल्यावर कुरुलकर यांनी उत्तर दिले होते की, “लाँचर हे माझे डिझाइन आहे. हे एक मोठे यश आहे. कुरुलकर आणि पाकिस्तानी एजंट्समधील हा संभाषण सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यानचे आहे.

दरम्यान, शास्रज्ञ असलेले डॉ. प्रदिप कुरुलकर यांच्यावर देशातील संवेदनशील शत्रू राष्ट्राला पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केल्यानंतर ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याचे दहशतवाद विरोधी पथकाने कसून चौकशी केली. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला असून डीआरडीओ ही सरकारी संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या वैज्ञानिकाने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याने एकच खळबळ उडाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या