Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेध७ पांढर्‍या घोड्यांचे महत्त्व

७ पांढर्‍या घोड्यांचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार घोड्याचे चित्र जीवनात प्रगतीचे द्योतक आहेत. पण याला कोणत्या दिशेने आणि कुठे लावावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया या संदर्भात खास पाच गोष्टी.

1 )घराच्या बैठकीमध्ये समुद्राच्या काठावर धावत असलेले सात घोड्यांचे चित्र लावावे.

- Advertisement -

2 )घोड्याचे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते, पण कार्यालयामध्ये दक्षिण दिशेस लावणे शुभ मानले जाते.

3 )या तसबिरी लावण्याने घरामध्ये सुखसमृद्धीसह लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते.

4 )हे नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा आणि विचार निर्माण करते.

5 )वास्तुशास्त्रानुसार धावत असलेले घोडे गती, यश, आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. यामुळे जीवनात प्रगती होते.

सात अंक खूप शुभ असतो. ऋषी सात, इंद्रधनुष्याचे रंग सात, सप्तपदी देखील सात. अशा अनेक गोष्टी 7 अंकाचे गुपित सांगतात. म्हणून सात घोड्यांची तसबीरच लावावी. घोड्याची तसबीर बहुतेक वेळेस व्यावसायिक संस्थेमध्ये आणि कार्यालयांमध्ये लावतात.

म्हणून घरामध्ये घोड्याचे तसबीर लावण्याचा आधी वास्तुतज्ज्ञाचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. ते आपणांस योग्य फोटो तसेच योग्य जागा याबद्दल सल्ला देऊ शकतात. कारण घराची बनावट बघून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. घोड्यांची तसबीर लावायची नसल्यास आपण तरंगणार्‍या माशांचे चित्र देखील लावू शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या