Thursday, April 25, 2024
Homeनगरvideo : प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना लागू करा

video : प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना लागू करा

अहमदनगर (प्रतिनिधी)-

करोना उपचारासाठी गळ्यातील मंगळसुत्र विकून पैसे भरायची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने कोविड उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले आहेत. ज्या दवाखान्यांंना कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता दिली आहे, त्या दवाखान्यांनी जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांंना महिनाभरापूर्वी पत्र दिले आहे. याची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी प्रशासनाला केला आहे. प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

‘सार्वमत संवाद’ या कार्यक्रमात आमदार कानडे यांच्याशी ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी संवाद साधला.

कोविड उपचार ते प्रशासनाची कार्यक्षमता अशा विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या खेड्यापाड्यावरील जनता खासगी करोना उपचार घेण्यात सक्षम नाही. त्यांच्यासाठी व्यवस्था उभारणी ही निरंतर करावी लागेल. मात्र जे गरिब नागरिक खासगी उपचार घेतात. सरकारची योजना असूनही त्यानी आर्थिक भुर्दंड सहन करणे अपेक्षीत नाही. त्यामुळे प्रत्येक कोविड उपचार केंद्रात जनआरोग्य योजना राबविलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या