Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाआयसीसीची घोषणा : भारतात होणार ‘टी20’ अन् ‘वन-डे’चा वर्ल्ड कप

आयसीसीची घोषणा : भारतात होणार ‘टी20’ अन् ‘वन-डे’चा वर्ल्ड कप

आयसीसीने (icc)पुढील 10 वर्षांसाठी कोणत्या देशांत कोणती स्पर्धा होणार याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार 2024 ते 2031 या काळात टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप (word cup)अशा साऱ्या स्पर्धा कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. त्यानुसार भारतात 2026 मध्ये टी20 वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे. भारत आणि श्रीलंका ही स्पर्धा होणार आहे. 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन भारतात होईल. तर 2031 मध्ये भारत आणि बांग्लादेश मिळून वन-डे वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहेत.

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

- Advertisement -

अमेरिकेत पहिल्यांदाच वर्ल्ड कप

आयसीसीने 2024 ते 2031 पर्यंतच्या प्रत्येक वर्षीच्या एका मोठ्या स्पर्धेचं ठिकाण जाहीर केलं आहे. यावेळी अमेरिकेत पहिल्यांदा एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन होईल. 2024 चा टी20 वर्ल्ड कप अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज हे देश मिळून याचे आयोजन करतील.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

आयसीसीच्या कार्यक्रमांची यादी

2024 टी20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज आणि अमेरिका

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी- पाकिस्तान

2026 टी20 वर्ल्ड कप- भारत आणि श्रीलंका

2027 वर्ल्ड कप- दक्षिण आफ्रीका, जिम्बाब्वे आणि नामीबिया

2028 टी20 वर्ल्ड कप- ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड

2029 चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत

2030 टी20 वर्ल्ड कप- इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड

2031 वर्ल्ड कप- भारत आणि बांग्लादेश

- Advertisment -

ताज्या बातम्या