Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात शेकडो एकर केळी, पपईच्या बागा उध्वस्त ; एकाचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात शेकडो एकर केळी, पपईच्या बागा उध्वस्त ; एकाचा मृत्यू

नंदुरबार। प्रतिनिधी nandurbar

चिनोदा येथे झाड कोसळून एक ठार प्रतापपुर ता.तळोदा येथील गाडीमालक युवकावर वडाचे झाड गाडीवर कोसळून जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच ग्रामस्थांनी वनविभागाला व तहसीलदारांना या रस्त्यावरील जिर्ण झाडे तोडण्याविषयी निवेदन दिले होते. मात्र, वनविभागाकडून दूर्लक्ष झाल्याने एकाच्या जीवावर बेतली म्हणून संतप्त जमावाने पोलीस स्टेशन गाठत सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल करण्यासाठी ठिय्या मांडला होता.

- Advertisement -

दि.4 मे सकाळी 10 वाजता अचानक वादळी वार्‍याने रौद्ररुप धारण केले. त्यात सर्वांचीच तारांबळ उडाली. राजेंद्र रोहिदास मराठे (वय- 42 रा प्रतापपुर ता तळोदा) हा तळोदाहून प्रतापपुरला जात असताना तळोदा शहराहुन 1 किलोमीटर अंतरावर चिनोदा रोडवरील भले मोठे वडाचे झाड मराठे यांच्या मालकीच्या आर्टीगा गाडी (जी जे 06- जे ई 0541) वर कोसळले. गाडीचा वरचा पत्रा फाटून त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. त्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिनोदा, प्रतापपूर, रांझणी गावातील ग्रामसथांनी मृतदेह बाहेर काढला. चिनोदा रस्त्याच्या दुतर्फा घनदाट मोठे व जीर्ण झाडे आहेत. झाडांचा धोका लक्षात घेता चिनोदा ग्रामस्थांनी झाडे काढून टाकण्याविषयी वनविभागाला निवेदनाद्वारे याआधी कळविले होते. परंतु वनविभागाने दखल घेतली नसल्याने राजेंद्र मराठे यांना प्राण गमवावा लागला.पंचक्रोशित दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच आ. राजेश पाडवी, तहसिलदार गिरीष वखारे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी,निसार मक्राणी घटनास्थळी दाखल झाले.

नवापूर तालुक्यात घरांची नुकसान नवापूर तालुक्यात घरांची पडझड नवापूर तालुक्यातील करंजी बुद्रुक परिसरात वादळ वार्‍यामुळे घराची पडझड व पत्रे उडाले आहेत. विजेचे खांब पडले आहेत. याबाबत नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करंजी बु चे लोकनियुत्त सरपंच आर.सी.गावीत यांनी केली आहे. बोरद वादळी वार्‍यामुळे नुकसान

बोरद परिसरात वादळी वार्‍यामुळे नुकसान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास बोरद, मालदा, न्यूबनसह परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुरू झाला. सर्वत्र धुळीचे त्याचबरोबर पावसाचे वातावरण निर्माण झाले. वार्‍यासोबत धूळ मोठ्या प्रमाणात उडू लागल्याने जवळचा व्यक्तीही दिसेनासा झाला होता. मात्र पाऊस कमी आणि वार्‍याचा वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मालदा, बोरद व न्यूबन येथे रस्त्यावर उभी असलेली मोठमोठी झाडे ही उन्मळून पडली. एवढा वार्‍याचा वेग होता. या वार्‍यामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. बोरद नजीकच असलेल्या न्यूबन या गावी महेंद्र बिरारी यांच्या घरावर झाड कोसळले. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर बोरद जवळ असलेल्या तर्‍हाडी या ठिकाणी कैलास तोताराम कोळी यांचे घराचे वादळी वार्‍यामुळे खूपच नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरात असलेल्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. बोरद ते शहादा या मार्गावर मोठ मोठी झाडे पडल्याने सकाळी 11 वाजेपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या