मोठी दुर्घटना! बोट बुडून तब्बल १०० जणांना जलसमाधी

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

नायजेरियामध्ये (Nigeria Boat Sinked) मंगळवारी भीषण घटना घडली असून बोट उलटल्याने जवळपास १०० लोकांचा मृत्यू (100 People Died) झाला आहे. उत्तर नायजेरियात ही दुर्घटना घडली असून यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

या बोटीवर जवळपास ३०० लोक होते. आतापर्यंत सुमारे १०० लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून, आणखी लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नायजर नदीमध्ये (Niger River) ही दुर्घटना घडली आहे. शोध सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Video : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले… नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, या बोटीत आधीपासूनच क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, त्यातच ही बोट पाण्यातील एका मोठ्या ओंडक्याला धडकल्यामुळे बोटीचे दोन तुकडे झाले, आणि ही बोट बुडाली. रात्री लग्न आटोपून ते परत येत असताना ही दुर्घटना घडली. स्थानिक अधिकारी अब्दुल गाना लुकपाडा यांनी याबाबत माहिती दिली.

ही दुर्घटना पहाटे तीनच्या सुमारास घडल्याने याबाबत अनेक तासांनी इतरांना माहिती मिळाली. त्यामुळे मदतकार्य देखील भरपूर उशीरा सुरू झाले. स्थानिक प्रशासनाला माहिती मिळण्यापूर्वी आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुमारे ५० जणांचे प्राण वाचवले होते.नायजेरियात अशा दुर्घटना सतत घडत असतात. स्थानिकांनी तयार केलेल्या नावेचा नदीतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळेच अशा दुर्घटना तिथे घडतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *