Saturday, April 27, 2024
Homeजळगाव‘वाघूर’च्या जलाशयात पर्यटनासाठी ‘हाऊस बोट’ सज्ज

‘वाघूर’च्या जलाशयात पर्यटनासाठी ‘हाऊस बोट’ सज्ज

आशिष पाटील

भुसावळ । Bhusawal

- Advertisement -

समुद्रात पर्यटन करण्यासाठी पर्यटकांना मुंबई, गोवा सह अन्य ठिकाणी जाऊन पर्यटन करावे लागते. मात्र तालुक्यातील वाघुर धरणात (Waghur Dam) अशा पर्यटनासाठी हाऊस बोट (‘House boat’) दाखल झाली आहे. आगामी काळात पर्यटकांना या दोन मजली जहाजातून वाघुरची सफर करता येणार अहे. या जहाजाची नुकतीच चाचणी घेण्यात आली आहे. यासह जलगाशयातील बेट सदृश्य 22 एकरावरील टेकळीवर हौशी पर्यटकांसाठी पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे.

तालुक्यातील वाघुर धरणाच्या प्रशस्त जलसाठ्यात पर्यटन करण्यासाठी केरळा प्रकारातील हाऊस बोट (House boat) तयार करण्यात आली आहे. ही जहाजाची बांधणी वाघुर धरणाच्या काठावर असलेल्या गंगापूरी (ता. जामनेर) या गावाजवळील जलसाठ्यात करण्यात आली आहे. सहा महिन्यांत या जहाजाची बांधणी इनलँड मरिन कोचिंग (केरळ) या कंपनीकडून करण्यात आली आहे.

लांबी 110 फुट, 18 फुट रुंद, 6 मीटर उंच अशी प्रशस्त अशी ‘केरळा स्टईल’हाऊस बोट आहे. यात पहिल्या मजल्याव 3 बेडरुम, एक किचन तर दुसर्‍या मजल्यावर 200 पर्यटकांची बैठक व्यवस्था असणार आहे. जहाजाच्या छताला बांबूपासून तयार करण्यात आलेल्या चटईचा वापर करण्यात आला आहे. जहाजामध्य अद्ययावत सुविधा ही प्रदान करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या आणखी दोन हाऊसबोटची बांधणी आगामी काळात होणार आहे. ही हाऊस बोट आकर्षक दिसत आहे.

वाघूर धरणाच्या जलाशयात पर्यटन केंद्र

वाघुर धरणाच्या महाकाय जलसाठ्याच्या मधोमध भुसावळ, जळगाव व जामनेर तालुक्यांच्या हद्दीवर 22 एकरांचे बेट (टेकळी) आहे. या बेटावर वर ‘बॅकउड इमरलँड’ नावाने पर्यटन केंद्र सर्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हौशी पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे. या प्रशस्त टेकळीवर 9 बांबू हट तयार सह पर्यटनासाठी साधनांचा वापर करण्यात येणार आहे. याच ठिकाणी प्रवेशद्वारावर भगवान शंकरांचे महाकाय मुर्ती साकरण्यात आली आहे. समुद्राती बेटा सारख्या असणारे हे पर्यटन केंद्र पर्यटकांसाठी मेजवाणीच ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या