Thursday, April 25, 2024
Homeनगरगणेशनगर-वाकडी रोडवरील हॉटेल आनंदवर छापा

गणेशनगर-वाकडी रोडवरील हॉटेल आनंदवर छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गणेशनगर ते वाकडी जाणार्‍या रस्त्यावर हॉटेल आनंद येथे अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस पथकाने छापा टाकून त्या ठिकाणाहून पोलिसांनी 8515 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना गणेशनगर ते वाकडी जाणार्‍या रस्त्यावर हॉटेल आनंद येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडार, सहाय्यक फौजदार राजेंद्र कृष्णा गोडगे, पोलीस नाईक सचिन सिताराम धनाड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश सुरेश पठारे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मेरट या पोलीस पथकाने संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेशनगर ते वाकडी जाणार्‍या रस्त्यावर हॉटेल आनंदच्या आतमध्ये प्रवेश करून काउंटरवरील इसमास आमची ओळख सांगून सदर छापा टाकत एकनाथ दशरथ अंभोरे (वय 33) रा. अस्तगाव, ता. राहाता याच्याकडून देशी विदेशी दारुच्या सीलबंद बाटल्या मिळाल्या.

यात 1050/- रु. किंमतीच्या देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या दारूच्या एकूण 15 सीलबंद क्वार्टर्स 180 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 70/-रु. विक्री किंमत, 1850/- रु. किं.च्या किंगफिशर कंपनीच्या बिअरच्या एकूण 10 सीलबंद क्वार्टर्स 650 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 185/-रु. विक्री किंमत, 900/- रु. किं.च्या नॉकआऊट कंपनीच्या बिअरच्या एकूण 5 सीलबंद क्वॉटर 650 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 180/-रु. विक्री किंमत, 1295/- रु किं.च्या ट्युबर्ग कंपनीच्या बिअरच्या एकूण 7 सीलबंद क्वॉटर 650 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 185/- रु विक्री किंमतीच्या, 1200/- रु किं.च्या इम्पेरिअल ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारुच्या एकूण 8 सीलबंद क्वॉटर 180 मीली क्षमतेच्या प्रत्येकी 150/- रु. विक्री किंमतीच्या, 600/- रु.कि.च्या ऑफीसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारुच्या एकूण 4 सीलबंद क्वॉटर 180 मीली क्षमतेच्या प्रत्येकी 150/- रु. विक्री किंमतीच्या. 900/- रु किं.च्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारुच्या एकूण 5 सीलबंद क्वॉर्टर 180 मीली क्षमतेच्या प्रत्येकी 180/- विक्री किंमतीच्या. 720/- कि.च्या स्टरलींग वि-7 कंपीनीच्या विदेशी दारुच्या एकुण 4 सीलबंद क्वॉटर 180 मीली क्षमतेच्या प्रत्येकी 180/- विक्री किंमतीचा असा एकूण 8515 रुपये किंमतीचा माल एकनाथ दशरथ अंभोरे कब्जात बाळगताना मिळून आला आहे. सदर जप्त बाटल्यांपैकी एक क्वार्टर केमीकल तपासणी कामी राखून ठेवून तीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे व पंचांचे सील लेबल जागीच केले. व सविस्तर पंचनामा केला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भेरट यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी एकनाथ दशरथ अंभोरे याचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या