Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसेंट लॉरेन्स शाळेत 'उम्मीद' वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सेंट लॉरेन्स शाळेत ‘उम्मीद’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नवीन नाशिक | प्रतिनिधी |Navin Nashik

शिक्षण (education) हि अशी गोष्ट आहे कि जो तुमचा स्वतःचा अभिमानाचा ठेवा आहे. शिक्षण हे तुम्ही तुमच्यासाठीच कमवले असते त्यामुळे तुम्हाला शिक्षण खूप गरजेचे आहे असे मत मराठी सिनेअभिनेते अमेय वाघ (Marathi film actor Amey Wagh) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

सेंट लॉरेन्स शाळेत (St. Lawrence School) “उम्मीद” नावाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान (Hindi film director Shashank Khetan) हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विध्यार्थी (students) व पालकांना मार्गदर्शन करतांना अभिनेते अमेय यांनी सांगितले कि, वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग घेतलेल्या सर्वच विध्यार्थ्यांना बक्षिस मिळेल असे नाही.

ज्या मुलांना बक्षिस मिळाले नाही त्यांच्या पालकांनी (parents) घरी घेल्यावर त्यांचे कौतुक करा कारण त्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवत प्रयत्न केले आहेत आणि प्रयत्न करणारा हा त्याच्या आयुष्यात नेहमी सफलच होतो. झिरो हा हिरो होऊ शकतो मात्र त्याला गरज आहे प्रयत्न आणि कष्टाची.

यावेळी मार्गदर्शन करतांना शाळेच्या विश्वस्त नलिनी दत्ता (School Trustee Nalini Dutta) यांनी सांगितले कि, करोनाचे (corona) सावट दूर होऊन आता जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी सर्व काही सुरळीत होण्याकरिता निदान दोन वर्षे तरी लागतील त्यामुळे सर्वांनी उम्मीद सोडू नका.

सध्या मुलांचा मोबाईलकडे (mobile) कल वाढला असून मुलांना जर मोबाईल पासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना घराच्या बाहेर मैदानी खेळ (Outdoor games) खेळायला पाठवा. यामुळे त्यांचे लक्ष मोबाईल कडे कमी जाईल.

मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता कुठल्याही भाषेतील गोष्टींची पुस्तके वाचून दाखवा हळूहळू त्यांना त्याची आवड निर्माण होईल व त्यांच्या विकासासाठी हे महत्वपूर्ण ठरेल. पालकांनी व मुलांनी आपल्या सभोवतालच्या सर्वांना “धन्यवाद” म्हणायला शिका. आभारातून विनम्रता येते आणि विनम्रतेतून आदराची भावना व्यक्त होते.

यावेळी शाळेच्या संस्थापिका सुमन दत्ता यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थी,पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमा नंतर विध्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विध्यार्थी,पालक,व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या