Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘होमिओपॅथी आपल्या दारी’ उपक्रम

‘होमिओपॅथी आपल्या दारी’ उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्याचे करोना संक्रमण सोबत इतर आजार, सांसर्गिक शक्यता, औषधांची ऐनवेळी लागणारी निकड, डॉक्टर्स आणि इतर दवाखान्यांत लगेचच दाखल करण्याची परिस्थिती व आर्थिक विवंचना यावर मात करण्यासाठी डॉ. वृषिनीत सौदागर यांनी ‘होमिओपॅथी घरोघरी’ ही फिरते रुग्णालय संकल्पना गरीब व गरजूंसाठी कार्यान्वित केली आहे.

- Advertisement -

होमिओपॅथी घरोघरी या संकल्पनेअंतर्गत फॉलोअपसाठी लांबून येणार्‍या कुटुंबियांना वाहनाची सोय करून देणे, अत्यावश्यक प्रसंगी औषधे घरपोच देण्याची सुविधा, रुग्णांना वाहन व्यवस्था, रुग्णांना दवाखान्यात येणे शक्य नसल्यास हॉस्पिटलमधील सहाय्यक डॉक्टर्स रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करतात. आवश्यकता असल्यास त्यांना पुढील वैद्यकीय मदत देण्यात येते. काही अत्यावश्यक तपासणीसाठी इतरत्र नेण्यास मदत देण्यात येते.

करोना कालावधीत बहुतेक दवाखाने बंद असताना डॉ. वृषिनीत सौदागर यांनी अत्यावश्यक होमिओपॅथी औषधांची घरपोच सेवा गेले सहा महिने दिली आहे. सर्व रुग्णांना सातत्याने तपासणे शक्य नसल्याने त्यांच्याशी डिजिटल मीडिया आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या नियमित औषधांचा पुरवठा घरपोच देण्याची सेवा दिली. सेवेस नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

यात अधिक पुढचे पाऊल म्हणून होमिओपॅथी आपल्या दारी संकल्पना सूरू करण्यात आली आहे. रुग्णाच्या घरच्यांची त्यासंदर्भातील मानसिक दोलायमान अवस्था, रुग्णांना मानसिक धीर देण्याची गरज, ऑक्सिजनची निकड इत्यादी बाबी लक्षात घेऊन हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

उत्तम आरोग्यासाठी, नियमित वैद्यकीय तपासण्या, औषधांचे सेवन आणि डॉक्टरांशी सातत्याने संपर्क आवश्यक आहे. डॉक्टर तुमच्या घरी आणि होमिओपॅथी तुमच्यासाठी ही संकल्पना डॉ. सौदागर हे नाशिक शहरासाठी राबवत आहेत. या उपक्रमात त्यांंना दहा सहाय्यक डॉक्टरांचे पथक सहकार्य करत आहे. नागरिकांनी या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. सौदागर यांनी केले आहे.

नंतर बघू या भावनेतून आपली वैद्यकीय सेवा पुढे पुढे ढकलत जातो. त्यामुळे अचानक गंभीर परिणामांना केवळ सातत्याने औषधे न घेतल्याने सामोरे जावे लागते आणि एकंदरीत जीवनाचे गणितच बदलून जाते. जवळ जवळ 12 वर्षांच्या अनुभवावरून रुग्णांच्या आजारांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्यांच्या आणि नातेवाईक अथवा शेजारी-पाजारी यांच्या मनाची जी घालमेल होते, त्यांना जे प्रश्न निर्माण होतात त्यातून जो वेळेचा अपव्यय होतो आणि त्यांचे जे शेवटी गंभीर परिणाम होतात त्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा ही नितांत गरजेची असते. हे सर्व समोर पाहिले असल्याने यातूनच ही संकल्पना पुढे आली. सेवाभाव हाच याचा मुख्य उद्देश आहे.

डॉ. वृषिनीत सौदागर

- Advertisment -

ताज्या बातम्या