नाशिक | Nashik
गंगा घाट परिसरात उघड्यावर राहणार्या एका बेघर व्यक्तीने हॉटेलच्या शेडमध्ये आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.20) पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
शांताराम लिलके (रा. गंगाघाट)असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लिलके गंगा घाट परिसरात उघड्यावर राहत होते.
रविवारी पहाटे त्यांनी येथील ओम गुरूदेव या हॉटेलच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
सकाळी द्यानंद सावंत हे नदीवरती जात असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी पंचवटी पोलीसांना कळवताच पोलीसांनी दाखल होत पंचनामा केला.
यापकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.