Wednesday, April 24, 2024
Homeजळगावमारहाण प्रकरणात खासदार उन्मेष पाटील यांची चौकशी होणार

मारहाण प्रकरणात खासदार उन्मेष पाटील यांची चौकशी होणार

मुंबई

भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिकास मारहाण प्रकरणात चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

- Advertisement -

२०१६ साली आमदार असतांना उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. यामुळे सोनू महाजन यांनी कुटुंबासह गृहमंत्र्यांची मुंबईत गुरुवारी भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांना भाजप सरकारने वारंवार पाठिशी घातल्याचा आरोप सोनू महाजन यांनी केला आहे. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनू महाजन मारहाण प्रकरणीच्या चौकशीचे आदेश दिले.

सोनू महाजन मारहाण प्रकरणात भाजपचे सरकार असल्याने त्यावेळी एफआयआर देखील दाखल झाला नव्हात. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या