गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत सुट्टी जाहीर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Elections)महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील 4 जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यात नाशिक, धुळे, नंंंदुरबर, पालघरचा समावेश आहे.

1 आणि 5 डिसेंबर अशा दोन दिवशी या जिल्ह्यांत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1 डिसेंबर व 5 डिसेबरला सुटी मिळणार असल्याने नोव्हेबरअखेर शुक्रवारी रजा टाकल्यास गुरुवारपासून सोमवारपर्यंत तब्बल 5 दिवस सलग सुटीचा आनंद सरकारी सेवकांना घेता येणार आहे. फक्त शुक्रवारी सुटी नाही. शनिवारपासून सोमवारपर्यंंत पुन्हा सुटीच राहणार आहे. त्यामुळे सरकारी कामकाज ठप्प होणार आहे.

राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. गुजरात निवडणुकीसाठी पहिल्यांंदाच सुटीचा अनुभव नागरिक घेणार आहेत. नोकरदार मंडळींना मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत दिली जाते. राज्यातील निवडणुकांवेळी असा आदेश देण्यात येतो. मात्र आता शेजारच्या राज्यातही मतदारांना मतदान करता यावे म्हणून राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.

गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी व व्यवसायासाठी आले आहेत. त्यांची नावे गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यासाठी तेथे सुट्टी असेल. मात्र महाराष्ट्रात आलेल्या मतदारांनाही तेथे जाऊन मतदान करता यावे या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशाला लागून असलेल्या जिल्ह्यांनाही कदाचित याप्रमाणे सुटी मिळण्याची शक्यता आहे.

शेजारील राज्यातील निवडणुकीसाठी राज्यात ठराविक भागात सुटी देण्याच्या राज्य सरकारच्या नवीन पायंंडयावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सत्ताधारी गट या निर्णयाचे स्वागत करत असला तरी विरोधक मात्र त्यावर टीका करीत आहेत. गेल्या पंधरवड्यापासून नाशिकमधील भाजप पदाधिकारी गुजरातमध्ये प्रचार करीत आहेत. आता मतदारांनाही ते घेऊन जातात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *