Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रन्यायालयाने विचारले, कर्मचारी विलीनकरणापूर्वी कामावर येणार का?

न्यायालयाने विचारले, कर्मचारी विलीनकरणापूर्वी कामावर येणार का?

एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees)नवीन वेतनवाढ ( New pay hike)लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र या सुनावणी दरम्यान तोडगा निघाला नाही. आता २२ डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisement -

न्यायालयाने कर्मचारी विलीनकरणापूर्वी कामावर रुजू होण्यास तयार आहेत का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना विचारला. कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुख्य मागणीवर राज्य सरकार विचार करत असताना आणि तो विषय प्रलंबित असताना संपकरी कर्मचारी आधी कामावर रुजू होणार का?, अशी विचारणा खंडपीठातर्फे करण्यात आली. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी सुरुवातील थेट उत्तर देणे टाळले. सध्या राज्य सरकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करत सुटले आहे, असे म्हणत सदावर्ते यांनी या प्रश्नाला बगल दिली.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

राज्याकडून संकेत नाहीत

राज्य सरकारने आजच्या अहवालात काहीही संकेत दिलेले नाहीत. विलीनीकरण करण्याविषयीच्या मुख्य मागणीचा प्रामाणिकपणे विचार होईल, असेही राज्य सरकारच्या कृतीतून दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आधी काही तरी सकारात्मक विधान करावे. त्यानंतर आम्ही कामावर रुजू होण्याचा विचार करु, असे सदावर्ते यांनी न्यायालयात सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या