Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकोची दौऱ्याआधीच PM मोदींना सुसाईड बॉम्ब हल्ल्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

कोची दौऱ्याआधीच PM मोदींना सुसाईड बॉम्ब हल्ल्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय केरळमधील कोची दौऱ्यावर जाणार आहे. या कोची दौऱ्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

- Advertisement -

सोमवारपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून त्याआधीच हल्ल्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. हे पत्र कोचीमधील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि तपासाला सुरुवात झाली.

धक्कादायक! क्रिकेट खेळताना १४ वर्षाच्या चिमुरड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

या पत्रावर एक पत्ता लिहिण्यात आला होता. पोलिसांनी या पत्त्यावर पोहोचून एन के जॉनी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही राजीव गांधींप्रमाणे हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान कोचीमधील रहिवासी असणारे जॉनी यांनी आपण असं कोणतंही पत्र लिहिलं नसल्याचं म्हटलं आहे. आपल्याविरोधात मनात राग असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने ही धमकी दिली असावी असं ते म्हणाले आहेत.

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री…”; पुण्यात अजित पवारांच्या बॅनरमुळे पुन्हा चर्चांना उधाण

दरम्यान पंतप्रधान मोदी केरळमध्ये रोड शो करणार असून जाहीर सभेला संबोधितही करणार आहेत. केरळ भाजपला पंतप्रधानांच्या या भेटीकडून मोठ्या आशा आहेत. पक्ष दक्षिण भारतात आपले कॅडर वाढवत आहे.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक पोहोचतील. हे पाहता आता हे धमकीचे पत्र मिळणे ही चिंतेची बाब आहे. जरी या पत्राबाबत विचित्र बाबी समोर येत असल्या तरीही या पत्राबाबत सर्व एजन्सी अलर्ट मोडवर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या