Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा बँकेच्या सत्तेसाठी लाचारी

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी लाचारी

जळगाव |jalgaon

जिल्हा बँकेसाठी (District Bank) मुक्ताईनगरातून (Muktainagar) बिनविरोध (Unopposed) निवड व्हावी यासाठी हे सर्व धडपड सुरु आहे. मुक्ताईनगरचे नाना पाटील यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे दाखवून त्यांचा अर्ज बाद केला. तसेच हरकती घेतल्यानंतर या हरकती ङ्गेटाळण्यासाठी अधिकार्‍यांवर मंत्र्यांकडून दबाव (Pressure from ministers on officials) आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते माजी मंत्री आ.गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत केला. बँकेच्या सत्तेसाठी इतकी लाचारी (Helplessness) पत्करु नये असा टोला देखील त्यांनी लगावला.

- Advertisement -

जिल्हा बँक निवडणुकीत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असतांना सर्व पक्षीय पॅनलबाबत नकार देण्यात आला. आम्ही स्पर्धेत राहू नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु होता. ऐनवेळी आम्ही अर्ज दाखल केले. खा. रक्षा खडसे, माजी आ. स्मिताई वाघ, नाना पाटील यांचे अर्ज बाद केले. उमेदवारी अर्जातील कागदपत्रे काढून घेतल्याचा आरोपही आ. महाजन यांनी केला. बिनविरोध होण्यासाठी मुक्ताईनगरचे गरीब शेतकरी नाना पाटील यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे दाखवून त्यांचा अर्ज बाद केला मग ही चिटींग नाही तर काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी नेत्यांकडून विश्‍वासघात
जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय पॅनल तयार करण्यासाठी सर्वच नेते एकत्र आलेत. मात्र ऐनवेळी घुमजाव करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्‍वास घात केल्याचा आरोप महाजन यांनी केला. सर्वपक्षीय पॅनल संदर्भात तीन वेळा बैठका झाल्यात, ङ्गार्म्युला ठरला मग ऐनवेळी नकार का दिला असे म्हणत आम्ही गाङ्गील राहीलो असल्याचीही कबुली आ. महाजन यांनी यावेळी दिली.

सहकार क्षेत्रात चुकीचे पायंडे
सहकार क्षेत्रात चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. यापुर्वी जिल्ह्यात असे कधीही राजकारण झालेले नाही. मात्र केवळ जिल्हा बँकेची खुर्ची वाचविण्यासाठी हा खटाटोप असून अधिकार्‍यांवरही दबाव आणला जात असल्याचा आरोप आ. गिरीश महाजन यांनी केला.

महाजनांचे एकनाथराव खडसेंना आव्हान
मुख्यमंत्री होण्याची योग्यता होती असे ते नेहमी सांगतात मग योग्यता असतांनाही ते राहत असलेल्या कोथडीच्या ग्रामपंचायतीवर किंवा मुक्ताईनगरात साधी सत्ता आणू शकले नाहीत. असा पलटवार आ. गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केला. जिल्हा बँकेत संचालक व्हायचे असेल तर हिंम्मत दाखवून निवडणुक घेवून लढा, बिनविरोध होण्यासाठी लाचारी पत्करुन आणि खोटी कागदपत्रे दाखवून नाना पाटील यांचा अर्ज बाद केला असा आरोप करत आ. महाजन यांनी खडसेंना निवडणूक लढण्यासाठी आव्हान दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या