Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसंकटात असलेल्या भावाला मदत करा - आचार्य पुलक सागर महाराज

संकटात असलेल्या भावाला मदत करा – आचार्य पुलक सागर महाराज

उमराणे | वार्ताहर

मंदिरासाठी ( Temple) दान नंतर करा पहिले संकटात असलेल्या भावाला मदत (Help) करा तरच तुमच्या जीवनाचे सार्थक होईल असे आवाहन आचार्य पुलक सागर महाराज (Pulak Sagar Maharaj) यांनी मालेगाव (Malegaon) येथे केले…

- Advertisement -

यावेळी पुलक सागर महाराज म्हणाले की, बालपणाचे दिवस चांगले असतात, दिवसातून शंभर वेळा भावा भावांमध्ये भांडणे (Quarrel) झाली तरी काही क्षणात मिटून जातात.परंतु लग्न झाल्यावर भावा भावात भांडणे झाली तर जीवनभर बोलचाल बंद होते. तसेच तुम्ही दहा लाख किंवा पाच लाख कमवा पण लहान भाऊ अडचणीत असेल तर प्रथम त्याला मदत करा,हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी चेतन पहाडे, संदेश कासलीवाल, अशोक पांडे, भरत पहाडे, प्रकाश बडजाते, अनिल छोरीया, राजेंद्र प्रेमचंद कासलीवाल यांनी अनिल पहाडे यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या