Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔट्रम घाटामध्ये अवजड वाहनांना परवानगी

औट्रम घाटामध्ये अवजड वाहनांना परवानगी

औरंगाबाद – aurangabad

३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे (Kannada Ghat) कन्नड घाटात जागोजागी दरड कोसळल्याने महामार्ग खचला होता. त्यामुळे औट्रम घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून १५ सप्टेंबर रोजी दुचाकी व हलक्या वाहनांसाठी व त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला करण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र, घाटात काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारणी व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे घाटात कोंडी निर्माण होऊन पूर्ण दिवस-रात्र वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या घाटातून होणारी अवजड वाहतूक १७ ते २७ पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

दिवसा घाट राहणार बंद

औट्रम घाटात दोन ठिकाणी संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या कामामुळे वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी या घाटातून दिवसा होणारी अवजड वाहतूक पुर्वीप्रमाणे वळविणे योग्य राहील, अश्या आशयाचे पत्र व्यवहार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला होता. त्यानुसार औट्रम घाट ५ डिसेंबरपर्यंत सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रात्री ८:०० ते सकाळी ८:०० वाजेदरम्यान, मात्र अवजड वाहतुकीसाठी हा घाट खुला राहणार आहे.

५ डिसेंबरपर्यंत वळविली वाहतूक

सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी अवजड वाहतूक औरंगाबाद-देवगाव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगाव-मालेगावमार्ग धुळे या मार्गे वळविण्यात आली आहे. तर औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक औरंगाबाद-देवगांव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगावमार्गे चाळीसगाव या मार्गे वळविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या