Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रRain Alert : पाऊस आजही झोडपणार! अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा... जाणून घ्या,...

Rain Alert : पाऊस आजही झोडपणार! अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा… जाणून घ्या, कुठे कसे असेल हवामान?

मुंबई । Mumbai

राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्याच्या अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड, नांदेड, ठाणे मुंबई आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तसेच गोंदिया जिल्ह्यालादेखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दूध दरवाढीवर संघांचा अनोखा फंडा; एसएनएफ घटल्यास पॉईंटला रुपया कमी

दरम्यान मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Accident News : ब्रेक फेल झाल्याने ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली, अनेक जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या