Friday, May 10, 2024
Homeनगरसमुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे झेडपीत धरणे आंदोलन

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे झेडपीत धरणे आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी पदावर गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असणार्‍यांना कायमस्वरूपी करावे, तसेच त्यांना ब वर्ग दर्जाच्या अधिकार्‍याचा दर्जा देण्यात यावा, या मागण्यांसाठी सोमवार (दि. 16) महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना एक दिवस काम बंद आंदोलन करणार आले.

- Advertisement -

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. शैलेश पवार, डॉ. सूर्यकांत यादव, डॉ. मुकुंदा गमे, डॉ. रेश्मा शेख, डॉ. ऋषिकेश अभंग, डॉ. भरत गव्हाणे, डॉ. अक्षय पठारे, डॉ. पूनम भोजने, अनिकेत पालवे, अनिकेत भंडारे, सचिन कळमकर, वैष्णवी केदारे, सौरभ शिंदे, दिनेश भोज, रूपाली मोहकर, मीनाक्षी कोठुळे, सूर्यकांत यादव, आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, सहा वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सेवा देत आहेत.

कोविड काळात त्यांनी चांगली सेवा दिल्याने राज्याचा आरोग्य विभागाचा देशात तिसरा क्रमांक आला. दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, प्रामाणिकपणे सेवा देत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 40 हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव (लॉयल्टी) बोनस मिळावा, निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन 36 हजार रुपये व कामावर आधारित वेतन 4 हजार रुपये करावे.

बदलीसंदर्भात धोरण निश्चित करावे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बढती द्यावी, आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन काम बंद करून मुंबई येथील आझाद मैदान व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या