नर डास जास्त धोकादायक की मादी डास?; भुजबळांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची फिरकी

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) आणि माजी मंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) प्रश्नावर आरोग्यमंत्री (Health Minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले…

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास (Mosquitoes)`घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले. या उत्तरानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सावंत यांना कोंडीत पकडले.

यावेळी भुजबळांनी सरकारने एकूण किती डास पकडले. डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत असा सवाल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारला.

दरम्यान, एवढेच नाहीतर डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? असे गमतीशीर प्रश्न देखील भुजबळ यांनी विचारले. त्यामुळे सभागृहात एक हश्शा पिकली. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही भुजबळांच्या प्रश्नावर याचा सविस्तर अहवाल टेबल केला जाईल, अशी माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *