Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशHDFC क्रेडिट कार्डबाबत RBI चा मोठा निर्णय

HDFC क्रेडिट कार्डबाबत RBI चा मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून (RBI) एचडीएफसी बॅंकेला (HDFC Bank) ला मोठा झटका देण्यात आला आहे.

- Advertisement -

आरबीआयने एचडीएफसीला “Digital 2.0″ अंतर्गत येणारे सर्व डिजिटल बिझनेस जनरेशन योजना थांबवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच नव्याने कोणालाही क्रेडिट कार्ड जारी न करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील 2 वर्षांमध्ये एचडीएफसी बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग, नेट बॅकिंग, पेमेंट युटिलिटीज बद्दल येणार्‍या तक्रारी आणि तांत्रिक गोंधळ पाहता याबद्दल काल नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान 21 नोव्हेंबर दिवशी देखील एचडीएफसीच्या प्रायमरी डाटा सेंटर मध्ये वीज गायब झाल्याने गोंधळ झाला होता.

व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही – एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे. एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा घडले होते. यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश आहे, ज्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता. या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे. आम्ही आयटी यंत्रणेवर काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेनं दिली आहे. या निर्बंधांचा बँकेच्या एकूण व्यवसायावर विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वासही एचडीएफसी बँकेने व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या