Saturday, May 4, 2024
Homeनाशिकहतगड : वनक्षेत्र रस्ता बांधण्यासाठी मंजुरी

हतगड : वनक्षेत्र रस्ता बांधण्यासाठी मंजुरी

हतगड। वार्ताहर | Hatgad

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) हतगड (hatgad) येथे वनक्षेत्र रस्ता (Forest area road) बांधण्याकरिता रस्ता कामाचे भूमिपूजन (Bhumipujan of road works) एन. डी. गावित (N.D. Gavit) यांच्या हस्ते करण्यात आले. हतगड येथील वनकक्ष क्रमांक 95/96 मधील 0.75 हे. वनक्षेत्र रस्ता बांधणी करीता वळती करण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयास सादर करण्यात आला होता.

- Advertisement -

त्यास उक्त अधिनियम व केंद्रीय नियमातील तरतुदी नुसार वरील सर्व बाबींचा विचार करून उपवनरक्षक तुषार चव्हाण (Deputy Forest Ranger Tushar Chavan) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारचा वापर करून ग्रुप ग्रामपंचायत हतगड (hatgad) येथील वनकक्ष क्रमांक 95/96 मधील 0.75 हे वनक्षेत्र रस्ता बांधणे करीता वनक्षेत्र कनाशी (प्रा) यांचे कार्यक्षेत्रातील वणेत्तर प्रयोजनाच्या कामासाठी ग्रामसभेच्या नियंत्रणाखाली वापरकर्ता अभिकरण तथा ग्रामपंचायत यांना

वनजमीन अनुसूचित जमाती इतर पारंपारिक वननिवासी वन अधिकाराची मान्यता अधिनियम 2006 मधील कलम 3(2) मधील 15 बाबी पैकी पुढीलबाबी करीता (ठ) रस्ते खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी कनाशी यांनी सदर मंजूर क्षेत्राची ताबा पावती करण्यात यावी असे पत्र काढले.

त्यास अनुसरून वनपरिमंडळ अधिकार्‍यांनी दि. 6 जुलै 2021 रोजी समक्ष जागेवर क्षेत्राची पाहणी करून हद्दी खुणा समजून उमजून क्षेत्राचा ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या व ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने ताबा दिला घेतला आहे. त्या अनुषंगाने आज रस्ता कामाचे भूमिपूजन एन. डी. गावित यांच्या हस्ते करून कामास सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच राधा खांबाईत, ग्रामसेवक वसंत भोये, हिरामण गावित, रंगनाथ पवार, पुंडलिक पवार, राजू पाटील, पोलीस पाटील गणेश जाधव, सुदाम पवार, वनरक्षक शिवाजी आहेर, काळू खांबाईत, संपत गांगुर्डे, रतन पवार, लक्ष्मण पवार, लक्ष्मण राऊत, सखाराम धुळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या