Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम... भाजपमध्ये जाणार?

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम… भाजपमध्ये जाणार?

दिल्ली । Delhi

गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujarat polls) हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे.

- Advertisement -

हार्दिक पटेल यांनी यासंदर्भात ट्वीट करून पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. या ट्वीटमध्ये हार्दिक पटेल यांनी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मकपणे काम करणार असल्याचं सांगत नव्या राजकीय वाटचालीचे देखील संकेत दिले आहेत.

दरम्यान काँग्रेस नेते मोबाईलमध्ये मश्गूल असतात, त्यांना जनतेशी काही घेणेदेणे नाही तसेच बहुतांश नेते हे दिल्लीतील नेत्यांच्या हुजरेगिरीतच अडकले असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.

हार्दिक पटेल २०१५ मध्ये पटेल आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या चळवळीच्या लोकप्रियतेमुळेच त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. त्याचा फायदा २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही पक्षाला झाला.

गेल्या वर्षी पक्षाने त्यांची गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, तेव्हापासून ते राज्य पातळीवरील पक्षनेतृत्वाला अनुकूल नव्हते.

हार्दिक पटेल गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या दोन बड्या नेत्यांच्या संपर्कात असून एका आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या