Friday, April 26, 2024
Homeनगरछळ करुन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले

छळ करुन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले

नेवासा –

सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील माहेर असलेल्या विवाहितीने

- Advertisement -

आत्महत्या केल्याची घटना सारोळा बद्धी ता. नगर येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलीचे वडील ज्ञानदेव त्रिंबक जावळे (वय 45) रा. माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांची मुलगी ज्योती हिचा अमित दिलीप हजारे यांचेशी 2018 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर तू मला आवडत नाही. तुझ्या बापाने हुंडा दिला नाही असे म्हणून मारहाण केली जात होती. 27 ऑक्टोबर रोजी ज्योतीचे सासरे दिलीप हजारे यांचा फोन आला की तीने विहिरीत उडी मारली आहे तुम्ही लवकर या. आम्ही सारोळा बद्धी येथे पोहचलो. ज्योती हिस अमित दिलीप हजारे, सासू मंदाबाई दिलीप हजारे, सासरे दिलीप एकनाथ हजारे यांनी लग्नात तुझ्या आईबापांनी काहीच सामान दिले नाही व हुंडाही दिला नाही या कारणावरुन पती अमित वेळोवेळी दारु पिवून शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सासू-सासरे नेहमी घरातील जास्त कामे सांगून माहेरच्या लोकांविषयी वाईट टोमणे मारुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिस आत्महत्येस प्रवृत्त केले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 305, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या