Friday, April 26, 2024
Homeनाशिकहरणबारी धरण ओव्हर फ्लो; मोसम नदीला पूर

हरणबारी धरण ओव्हर फ्लो; मोसम नदीला पूर

हरणबारी । राकेश लाडे| Haranbari

बागलाणसह (baglan) मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) मोसमखोर्‍याला वरदान ठरणारे हरणबारी धरण (Haranbari Dam) ओव्हर फ्लो (Overflow) झाले असून सांडव्यातून 6,221 क्युसेक पाण्याचा वेगाने विसर्ग (water discharge) होत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा धरण लवकर भरले असून मोसमखोर्‍यांती शेतकरी (farmers) व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हरणबारी धरणाची साठवण क्षमता 1,166 द.ल.घ.फूट असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह मोसमखोर्‍यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पर्जन्यवृष्टी (heavy rain) सुरू असल्याने काल (दि. 11) रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी धरण तुडूंब भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याच्या विसर्गामुळे मोसम नदीला (mosam river) दुथडी पूर आला आहे.

पावसाळा (monsoon) सुरू होऊन देखील मोसमखोर्‍यातील काही गावांना पाणीटंचाईचा (Water scarcity) सामना करावा लागत होता. गेल्या चार दिवसांचा पाऊस आणि मोसम नदीला (mosam river) आलेल्या पुरामुळे मोसम नदीकाठावरील सर्वच पाणीपुरवठा योजना जीवंत होऊन पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. त्याबरोबरच शेतकरी (farmers) वर्गाच्या खरीपासह रब्बी हंगामाच्या (rabbi season) आशाही पल्लवित झाल्या आहेत.

हरणबारी धरणाच्या पाण्याचा प्रामुख्याने रब्बी हंगामासह उन्हाळ्यात (summer) मोसम काठावरील पाणीपुरवठा योजनांना उपयोग होतो. धरण 100 टक्के भरल्याने बागलाणसह मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) अनेक गावांना गरजेनुसार खरीप हंगामात (kharif season) देखील पूरपाण्याचा लाभ होणार असल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

धरणाच्या लाभक्षेत्रात अजूनही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग (water discharge) वाढून मोसम नदीच्या पूरस्थितीत वाढ होण्याची शक्यता असल्याने महसूल विभागातर्फे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी (Revenue and Irrigation Department officials) समन्वय ठेऊन संभाव्य पूरस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरणबारी धरणात 1,166 द.ल.घ.फूट (100 टक्के), चणकापूर धरणात 1,628 द.ल.घ.फूट (67 टक्के), केळझर धरणात 423 (74 टक्के) तर पुनद धरणात 755 द.ल.घ.फूट (58 टक्के) पाणीसाठा झाला आहे. हरणबारीतून मोसम नदीत 6,221 क्युसेक तर पुनदमधून गिरणा नदीत 9,589 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दोन्ही नद्यांच्या काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या