Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहनुमान जन्मस्थळ प्रकरण : महंतांच्या वादावर पडदा; शास्रार्थ सभेला अखेर सुरुवात

हनुमान जन्मस्थळ प्रकरण : महंतांच्या वादावर पडदा; शास्रार्थ सभेला अखेर सुरुवात

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

नाशिक जिल्ह्यातील आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. आज नाशिकरोड परिसरात शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा सुरु होण्याच्या आधीच आरती संपन्न झाल्यानंतर महंतांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेवरून वाद उफाळला होता. यानंतर सामंजस्याची भूमिका घेतल्याने सभेला जमिनीवर बसून सुरुवात झाली….

- Advertisement -

कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दाव्यानंतर या वादाने पेट घेतला. गोविदानंद महाराजांनी याबाबत नाशिकच्या साधू महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्या संदर्भात खुले आव्हान दिल्यानंतर आजची सभा आयोजित करण्यात आली.

हनुमान जन्मस्थळाचा वादावरून अंजनेरीचे (Anjneri) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्वांच्याच नजरा आजच्या या सभेकडे खिळल्या आहेत. कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविदानंद महाराज हे नाशिकला आलेले आहेत. श्री अनिकेतशास्त्री देशपांडे (महंत) यांचा आश्रम महर्षी पंचायतन सिद्धपीठम् नाशिकरोड पासपोर्ट ऑफिसच्या पाठीमागे येथे हनुमान जन्म भूमीवर शास्त्रोक्त चर्चा सुरु झाली आहे.

या धर्मशास्त्र सभेच्या अंती काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. परिसरात मोठी गर्दी असून अंजनेरी येथूनही अनेक भाविक याठिकाणी ग्रामस्थांसह दाखल झालेले आहेत. सभेच्या सुरुवातीलाच वाद झाल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसराचा ताबा पोलिसांनी घेतला होता. यानंतर हा वाद मिटला आणि पुन्हा एकदा या सभेला सुरुवात झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या