Friday, April 26, 2024
Homeनाशिकजीम चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

जीम चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

नाशिक । Nashik

राज्य शासनाने अनलाॅक ३ मध्ये जीम उघडण्यास परवानगी नाकारली आहे. त्याच्या निषेधार्थ जीम चालकांनी मंगळवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. जीम सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

- Advertisement -

करोना संकटामुळे राज्य शासनाने जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे जीम चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’ म्हणत अनलाॅकमध्ये अनेक बाबींना परवानगी दिली आहे. मात्र अोपन व्यायाम शाळा वगळता जीम खोलण्यास परवानगी नाकारली आहे. या निर्णयाचा जिम चालकांनी निषेध नोदवला आहे. नाशिक जिम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. जिम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.

-गेल्या चार ते पाच महिन्यापासून जिम बंद असल्याने जिम मालक आणि ट्रेनर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याकडे लक्ष वेधत जिम वाचवा अशा प्रकारच्या फलक हातात घेऊन आंदोलन केले.सरकारने विचार नाही केलं तर आमच्या पध्दतीने जिम सुरू करण्याचा इशारा यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या