Friday, April 26, 2024
Homeनगरसाईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

शिर्डी | प्रतिनिधी

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांना गुरु स्वरुप मानत हजारो साईभक्त गुरुचरणी नतमस्तक होत आहेत. गुरूपोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश येथील साईभक्‍त वामसी कृष्‍णा विटला यांनी साईबाबांना (Saibaba) अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे.

- Advertisement -

३५५ ग्रॅम वजनाचा २० लाख रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट वामसी कृष्‍णा यांनी साईचरणी अर्पण केला. दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुपुर्द करण्यात आला. वामसी कृष्‍णा आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मुर्तीला परिधान करण्यात आला. साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांचे हस्ते वामसी कृष्णा आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या