Thursday, April 25, 2024
Homeनाशिकद्राक्षाचा उत्पादन खर्च महाग, उत्पादकांना कोविड निर्बंधाचा फटका

द्राक्षाचा उत्पादन खर्च महाग, उत्पादकांना कोविड निर्बंधाचा फटका

पिंपळगाव बसवंत । Pimpalgoan

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष इंडस्ट्री द्राक्षाच्या बाजार भावामुळे नाराज आहे. युरोपात द्राक्ष मागणी कमी झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बाजारभाव देखील कमी झाली आहे.

- Advertisement -

सलग तीन वर्षापासून होणार्‍या अवकाळी पावसामुळे द्राक्षउत्पादन शेतकर्‍यांनी द्राक्ष बागा सप्टेंबर ऐवजी ऑक्टोंबरमध्ये छाटणी जास्त झाल्या. या कारणाने द्राक्ष एकदमच बाजारपेठेत आले आहेत. द्राक्षाच्या कमी उठावामुळे बाजारभावावर याचा परिणाम दिसू लागला आहे.

मागील वर्षी कोविड 19 काळात देखील याच परिस्थितीचा सामना द्राक्ष उत्पादन करणार्‍या शेतकर्‍याने केला होता. तिच परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे. कोरोना संकट अजुन निवारले नाही. परत लॉकडाऊन होते की काय अशी भीती देखील द्राक्ष उत्पादन करणार्‍या शेतकरी बांधवांना वाटत आहे. द्राक्ष उत्पादनात एकरी 3 लाख रुपये इतका खर्च येत असतो. त्याच्या निंमपट देखील रक्कम द्राक्ष उत्पादन करणार्‍या शेतकरी राज्याला मिळत नाही.

सलग तीन वर्षापासून हे द्राक्ष उत्पादन खर्च करायला महाग झाले असून, शेतकरी बँक व पावडर दुकानदार यांना देखील पैसे देऊ शकत नाही. एवढी परिस्थिती द्राक्ष उत्पादन करणार्‍या शेतकर्‍याची खालावलीआहे.

सध्याचे बाजारभाव

थॉमसन – 25 ते 30 रू.

आरके., एसएसएन,

सोनाका – 35 ते 40

शरद सिडलेस – 25 ते 30

नानासाहेब परपल – 40 ते 60

करोनाचा फटका, शेतकरी संकटात

कोवीड 19 उद्रेकामुळे निर्यातीला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला असून याचा थेट परिणामबाजारभाव व उत्पादकावर होत आहे. उत्पादन हे खर्च करायला देखील महाग झाले आहे. त्यात उठाव कमी असल्याने बाजारभाव घसरण झाली आहे.

-मनोज जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या