Tuesday, April 23, 2024
HomeUncategorized'ग्रेपसिटी' होईल 'वेलनेस सिटी'!

‘ग्रेपसिटी’ होईल ‘वेलनेस सिटी’!

तेजस चव्हाण

नाशिकचे वातावरण, येथील हवा, कनेक्टिव्हिटी, पाऊस-पाणी हे सगळे काही ‘वेल’ आहे. त्यामुळे नाशिक ‘वेलनेस सिटी’ होण्यास कोणताही अडसर नाही. नाशिककर, स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाने एकत्रित प्रयत्न केल्यास येत्या काही वर्षांत ‘ग्रेपसिटी’ असलेल्या नाशिक शहराला ‘वेलनेस सिटी’ म्हणून नवी ओळख मिळू शकते.

- Advertisement -

भारतात ‘वेलनेस’ या विषयाबद्दल बर्‍यापैकी माहिती खूप वर्षांपासून झाली आहे. अनेक पर्यटक आणि कुटुंबे वेलनेससाठी भारतात येतात. भारतात केरळ, उत्तराखंड येथील ऋषिकेश येथे प्रामुख्याने येतात. वेलनेससाठी वातावरण फार महत्त्वाचे! तेथे वातावरण चांगले असल्याने लोक जास्त संख्येने येतात हे कारण आहे. आसपासचे वातावरण असे हवे की त्यामुळे लोकांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या चांगले वाटले पाहिजे.

ऋषिकेश, केरळ व दक्षिणेकडील वातावरण नाशिकसारखेच आहे. म्हणजे नाशिकला पाऊस चांगला पडतो. हवा ताजी आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे नाशिक ‘वेलनेस’साठी उत्तम शहर आहे. मंत्रभूमी, गुलशनाबाद, यंत्रभूमी, ग्रेपसिटी, कुंभनगरी अशी नाशिकची वेगवेगळी ओळख आहे. वास्तविक कोस्टल भागात खूप पाऊस, ऊन, जादा ह्युमिडिटी असते. अशा ठिकाणी लोक वेलनेससाठी जात नाहीत.

‘वेलनेस डेस्टिनेशन’ बनण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. जगात सर्वत्र तंदुरुस्ती आणि आरोग्याच्या बाबतीत जागरुकता आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शहरात काही ना काही हालचाली होत आहेत. नाशिकमध्ये सायकलिंग मुव्हमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणजे भारतात सर्वात मोठी सायकल चळवळ पाहायची असेल तर ती नाशिकमध्येच आहे.

येथे दर शनिवारी व रविवारी मुंबई महामार्ग, त्र्यंबकरोड व गंगापूररोड येथून 400 ते 500 नाशिककर सायकलिंग करताना दिसतात. अशा पद्धतीने ही चळवळ सुरू आहे. आपल्याकडे भरपूर जीम, योग विद्याधाम (विद्यापीठ) आहे. जगातील लोक योग विद्याधाममध्ये योगा शिकायला येतात. ही चळवळ आधीपासूनच सुरू झाली आहे.

नाशिक ही ‘वेलनेस सिटी’ वा हब झाले तर प्रत्येक गोष्टीला चालना मिळेल. एक अभ्यास असा आहे की, कुठलाही पर्यटक एखाद्या शहरात येतो तो नऊ वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाला पैसै देऊन जातो. उदा. एक पर्यटक वेलनेससाठी बंगलोरला गेला तर तो तिथे हॉटेलमध्ये राहील. तिथे रूम घेईल. गाडीत पेट्रोल भरेल. रेस्टॉरंटला भोजनाचा आस्वाद घेईल. खरेदी करेल व वेलनेसचे प्रशिक्षण घेईल. अशा नऊ वेगवेगळ्या व्यवसायांना तो चालना देईल. अशा पद्धतीने एक पर्यटक आल्याने एवढा व्यवसाय होतो.

तसेच नाशिकला केवळ वेलनेसच नव्हे तर इतर गोष्टींनाही मागणी वाढेल. प्रत्येक गोष्टीला मागणी वाढेल. व्यवसाय वाढतील. वेलनेसच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या आहेत. नाशिकबाबत बोलायचे झाले तर वेलनेस सेंटर किंवा इंडस्ट्री पाहिजे, म्हणजे त्यात सर्वात महत्त्वाचे अ‍ॅस्पेक्ट आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे लोकेशन चांगले पाहिजे. लोकांना आल्यावर छान वाटले पाहिजे. राहण्याची उत्तम सोय हवी. तिथे गेल्यावर लोकांना शांत वाटायला पाहिजे.

वातावरण चांगले पाहिजे. सर्व खाणे-पिणे आरोग्यदायी (हायजेनिक), नैसर्गिक (नॅचरल) आणि ऑर्गेनिक (सेंद्रीय) असावे. यातूनच माणसाला मानसिकरीत्या चांगले वाटते. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला लोकांना घेऊन जाण्यासाठी पुरेशा सुविधा पाहिजे. ट्रेकिंगला घेऊन जाता आले पाहिजे. नदी व अन्य नयनरम्य ठिकाणी नेण्याची व्यवस्था असावी. सायकलिंगला घेऊन जाण्याची सोय हवी. म्हणजे वेलनेसच्या आसपास या गोष्टीही गरजेच्या आहेत.

त्या सर्व नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. त्याची उपलब्धी म्हणजे नुसते राहून किंवा योगा, फिरणे न करता लहानशा गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. लोकांना चांगले योगा व मेडिटेशन शिकवण्यासाठी चांगल्या योगा संस्था असाव्यात. त्यातही खूप वेगवेगळ्या ट्रिटमेंट आहेत. केरळला ‘केरळा मसाज’ आहे. इंटरनॅशनल स्पा थेरपी, मसाज आहेत.

आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी ट्रिटमेंट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयी-सुविधा चांगल्या हव्यात. लोकांना त्या ठिकाणाहून चार, पाच ते दहा दिवस राहता आले पाहिजे. वेलनेसला टूरिझम पोटेंशिअल कनेक्टिव्हिटीने देता येईल. म्हणजे शहरासाठी चांगली विमानसेवा हवी. रेल्वेची फ्रिक्वेन्सी चांगली पाहिजे. रस्ते चांगले असावेत. स्थानिकांचा सहभाग असायला हवा. आता सर्वत्र योगाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यात आणखी चांगले व जास्त योगा शिक्षक आले तर अधिक चांगलेच होईल.

प्रत्येक भागात जसे दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबक भागात छोटे-छोटे युनिट उघडले तरी योगाचे टूरिझम पोटेंशिअल वाढेल. प्रत्येक वयानुसार व प्रत्येक वर्गाला त्यात सहभागी केल्यास तेसुद्धा फायदेशीर ठरू शकेल. एखाद्याला दोन हजार रुपये, दुसर्‍याला 20 हजार रुपये, तिसर्‍याला दोन लाख रुपये खर्च करायचे असल्यास या सर्व वर्गाला कॅटर केले तर टूरिझमचे पोटेंशिअल वाढेल. वेलनेसबाबत सांगायचे झाल्यास एक पर्यटक नाशिकला येतो व तो नऊ व्यवसायांना पैसे देतो.

नाशिकसाठी ते फायद्याचेच आहे. हा पैसा नाशिकलाच मिळेल. दुसरे म्हणजे नाशिकचे नाव एका वेगळ्या पातळीवर जाऊ शकते. ऋषिकेशला जगभरातून लोक येतात. मेडिटेशन, योगा व ट्रेकिंग करतात. चांगले जेवण करतात. 80 ते 100 इन्स्टिट्यूट येथे आहेत. महिनाभर लोक येथे राहतात. नाशिकलासुद्धा असेच होऊ शकते. केरळ राज्य एकट्या पर्यटनावर चालते. विशेष करून वेलनेससाठी! ‘आयुर्वेदिक केरळा मसाज’साठी ते प्रसिद्ध आहे. तसे नाशिकचे नाव ‘वेलनेस सिटी’ होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या