Wednesday, April 24, 2024
Homeनगरमहिलेकडून ग्रामसेवकास मारहाण

महिलेकडून ग्रामसेवकास मारहाण

नेवासा | तालुका प्रतिनिधी

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला शिवीगाळ दमदाटी करून गचंडी धरून चप्पलने मारहाण करत जखमी केल्याची घटना

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी महिलेविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामसेवक रमेश खंडेराव गायके (वय 53) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी आज दिनांक 19 मार्च 2021 रोजी त्याचे कुकाणा ग्रामपंचायत कार्यलयात जात असताना आरोपी महिलने शिवीगाळ दमदाटी करून गाचंडी धरून चप्पलने मारहाण करून जखमी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

या फिर्यादी वरून सदर महिले विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला पोलिसांचा ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे हे करत आहेत. तसेच यातील महिलेच्या फिर्यादी वरून ग्रामसेवक यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या