Friday, April 26, 2024
Homeनगरग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

तर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची पगारसाठीची जाचक अट असलेला 28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, बाळासाहेब लोखंडे, यशराज शिंदे, शिवाजी शिर्के, सतीश पवार, पंडित माने, अलका भिंगारदिवे, मंदा गायकवाड, आशा जाधव, सतीश आव्हाड, अजित आव्हाड, राहुल चव्हाण आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आंदोलन करून, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी एक दिवसीय काम बंद ठेवले. या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसाठी करवसुली व उत्पन्नाची जाचक अट असलेला 28 एप्रिल 2020 शासन निर्णय त्वरित रद्द करून सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना किमान वेतनासाठी 100 टक्के अनुदान द्यावे व वेतन, पेन्शन, सुधारित किमान वेतन त्वरित लागू करण्यासह इतर प्रलंबीत मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

सदरील मागण्यांसाठी 10 जुलै 2020 रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. परंतु शासनाने याची देखील दखल घेतलेली नसल्याने ग्रामपंचायत महासंघाच्यावतीने राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागणीचे निवेदन ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषदेत देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या