राज्यपालांचा दर्शनपुजेचा कार्यक्रम अचानक रद्द

jalgaon-digital
1 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) यांचा आज सकाळी आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांच्या मंदीरातील (Sai Baba Temple) राखीव ठेवलेला दर्शनपुजेचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे.

रद्द करण्यामागील नेमके कारण साईसंस्थान प्रशासनाला (Sai Trust Administration) समजू शकले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान आज दि.27 रोजी राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून नियोजन कार्यक्रमाप्रमाणे राज्यपाल कोशारी (Governor Bhagat Singh Koshari) मुंबई येथील राजभवनातून सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना होऊन शिर्डी हेलीपॅडवर (Shirdi Helipad) आगमन करणार आहे. त्यानंतर तेथून साईमंदीरात सकाळी सव्वानऊ ते दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या हस्ते साईंची पाद्यपूजा दर्शन कार्यक्रम राखीव ठेवला होता. यासाठी शासकीय यंत्रणा तसेच साईबाबा संस्थानने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

राज्यपालांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याने शिर्डी (Shirdi) शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.साईसंस्थानच्या वतीने देखील साईमंदीरात नियोजन करण्यात आले आहे. परंतु मंगळवारी दुपारी अचानक जिल्हाधिकारी यांच्याकडून साईबाबा संस्थानला प्राप्त झालेल्या नियोजित दौर्‍यात साईमंदीर (Sai Temple) वगळण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत संस्थान प्रशासनाशी संपर्क साधून विचारले असता त्यांना देखील कारण कळवले नसल्याचे सांगितले.असे असले तरी राज्यपालांनी साईमंदीर दौरा का टाळला असा प्रश्न शिर्डीकरांना भेडसावत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *