Wednesday, April 24, 2024
Homeजळगावजीएमसीत आजपासून वॉररुम कार्यान्वीत

जीएमसीत आजपासून वॉररुम कार्यान्वीत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देत त्याठिकाणावरील परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

यात उद्यापासून याठिकाणावरील वॉर रुम सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी 50 बेड साईड असिस्टंडची नेमणुक करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी 22 मार्च रोजी भेट देत आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी करोना व्यवस्थापनविषयी माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. अरुण कसोटे, रुग्णालयाचे नोडल अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, कृषी अधिकारी अनिल भोकरे, डॉ. संदीप पटेल, डॉ. इम्रान तेली, अधिसेवीका कविता नेतकर उपस्थित होते. रुग्णालयातील कोरोना रुग्ण व्यवस्थापनाविषयी डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. रुग्णालयातील अडचणी समजून घेत सूचना केल्या.

करोना बाधित आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले डॉक्टर्स, परिचारिका रुजू होतील तसा मनुष्यबळाचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी देणार पोलिस

रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित झाला आहे. त्यासाठी आता पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांची मदत जिल्हाधिकारी देणार असून लवकरच कोविड रुग्णालयात सुरक्षेसाठी पोलीस दिले जाणार आहे.

वॉर रुमसाठी समिती गठीत

खाटा प्रवेश व्यवस्थापन समिती, मृत्यू समन्वय समिती, वॉर रूम सोमवारी 22 मार्च रोजी गठीत करण्यात आली आहे. यात रुग्णांना खाटा मिळतील का, रुग्ण-नातेवाईक संवाद घडवून आणणे, नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणे हे काम केले जाणार आहे.

त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येणार आहे. हा वॉर रूम जनसंपर्क कक्ष येथे मंगळवारी 23 पासून कार्यान्वित करण्यात येत असून या वॉर रूमची देखील पाहणी नोडल अधिकार्‍यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या